Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 241 नवे पॉझिटिव्ह तर 22 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वच स्तरावरून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 241 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज कोरोनामुळं पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 4 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 639 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 60 हजार 86 वर गेली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 49 हजार 919 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 6004 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 620 जण हे क्रिटिकल असून त्यापैकी 346 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

You might also like