Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 288 नवे पॉझिटिव्ह तर 17 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरेानाचे 288 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 8 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 4180 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 441 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 60 हजार 374 वर गेली आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 50 हजार 360 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5834 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 605 जणांची प्रकृती क्रिटिकल असून त्यापैकी 338 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत.