Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 185 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील चौघांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील चौघांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं पुण्यात तब्बल 4 हजार 352 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 357 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 63 हजार 619 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 54 हजार 485 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 4 हजार 782 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 378 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 239 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात यें आहे.