Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सोमवारच्या तुलनेत झपाट्यानं वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 416 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 218 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 67 हजार 604 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 58 हजार 54 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 110 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 419 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 251 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

You might also like