Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 406 नवे पॉझिटिव्ह अन् तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 406 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 451 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 320 रूग्ण उपचारानंबर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 68 हजार 866 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 59 हजार 14 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 401 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 413 जण हे क्रिटिकल असून त्यापैकी 249 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

You might also like