Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं चौघांचा मृत्यू, जाणून घ्या आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासामध्ये कोरोनामुळं चौघांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 6 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळं आतापर्यंत तब्बल 4 हजार 486 रूग्णांचा बळी गेला. आज दिवसभरात तब्बल 423 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही एक समाधानाची बाब आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनाचे 351 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 71 हजार 769 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत 1 लाख 61 हजार 979 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 5 हजार 304 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 425 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 250 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.