Pune News : गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 292 नवे पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात रविवारी (दि.27) 292 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 470 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 883 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 387 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 226 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 161 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 613 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 097 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 77 हजार 872 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 69 हजार 162 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाचं नव रुप समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं स्वागत करताना गर्दी टाळा, घरात बसून सेलिब्रेशन करा, संयम राखा असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे तसेच एक विनंती केली आहे. लंडन किंवा युरोपियन देशांमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी आणि पुढील उपाय योजना राबवण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे महापौरांनी सांगितले आहे.