Pune News : पुणे शहरात दिवसभरात 237 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 477 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात शनिवारी (दि.2) 237 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 477 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शनिवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 844 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 257 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 165 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 92 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 640 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 046 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 79 हजार 308 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 71 हजार 622 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविड लसीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कोविड ड्राय रन घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी 9 ते 11 दरम्यान ही ड्राय रन पार पडली. ज्या कर्मचाऱ्यांवर ड्राय रन घेतली गेली त्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कोरोना लसीकरणासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर नोंदणी केलेली होती.