Pune News : पुणे शहरात दिवसभरात 135 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 202 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात सोमवारी (दि.4) 135 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 202 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 901 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 202 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 652 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 837 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 79 हजार 733 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 72 हजार 244 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डीजीसीआयने Covaxin आणि Covishield या दोन लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीसकरणासंदर्भात मोठं वक्तव्य केलं. देशातील कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मेड इन इंडिया लसीबद्दल शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या योगदानाबद्दल देशाला अभिमान असल्याचे मोदींनी म्हटले आहे.