Pune News : पुणे शहरात दिवसभरात 264 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह. 9 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात रविवारी (दि.10) 264 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 214 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 954 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 208 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 679 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 689 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 81 हजार 511 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 74 हजार 143 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दक्षिण अफ्रिकेतील महाभयंकर नव्या कोरोनाने (south africa corona strain) भारतात शिरकाव केला असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईजवळ पोहोचला आहे. कोरोनाचे हे रुप भयंकर असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईतल्या खारघरमधील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील असे तीन रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये E484K म्‍युटेशन असलेला कोरोना व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा कोरोनाव्हायरस असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही दक्षिण अफ्रिकेतील हा स्ट्रेन अधिक भयंकर आहे. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरस विरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. हे रुग्ण ठाणे आणि रागयगडमधील असल्याचे समजते.