Pune News : पुणे शहरात दिवसभरात 261 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 240 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात शुक्रवारी (दि.15) 261 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची वाढ झाली आहे. तर 240 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 161 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात पुणे शहरातील 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 696 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 619 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 82 हजार 709 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 75 हजार 394 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (pune serum institute of india) तयार केलेल्या कोरोना लशीसह भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला आपात्कालीन मंजूरी दिली. यानंतर जगातील बहुतेक देशांचं लक्ष हे भारताकडे आहे. बऱ्याच देशांनी भारतातील कोरोना लस हवी आहे. अगदी यूकेतील (UK) ऑक्सफोर्ड – अ‍ॅस्ट्राझेनेकाचीही भारतात तयार झालेल्या लशीला मागणी आहे. भारतातील कोव्हिशिल्ड लशीला आता नेपाळमध्येही परवानगी देण्यात आली आहे.