Pune News : पुणे शहरात दिवसभरात 121 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात सोमवारी (दि.18) 121 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 151 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 042 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण शहराबाहेरील आहे. आतापर्यंत 4 हजार 709 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 462 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 83 हजार 295 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 76 हजार 124 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात फक्त 1 हजार 924 रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 854 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 19 लाख 92 हजार 683 इतकी झाली आहे. तर 18 लाख 90 हजार 323 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.राज्यात आज दिवसभरात 35 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 50 हजार 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.