Pune News : पुणे शहरात दिवसभरात 310 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 353 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात बुधवारी (दि.20) 310 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 353 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 852 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 720 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 255 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 83 हजार 787 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 76 हजार 812 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 73 हजार 702 रुग्णांपैकी 3 लाख 59 हजार 875 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 947 आहे. यामध्ये स्ट्रेन या नवीन कोरोनाच्या 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.30 टक्के आहे.