Pune News : पुणे शहरात दिवसभरात 232 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 7 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात शुक्रवारी (दि.22) 232 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 290 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 428 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 729 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 111 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 84 हजार 246 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 77 हजार 406 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 74 हजार 736 रुग्णांपैकी 3 लाख 61 हजार 51 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 790 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.35 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.