Pune News : पुणे शहरात दिवसभरात 208 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह. 229 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात रविवारी (दि.24) 208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 229 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 836 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात शहरातील 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 738 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 051 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 84 हजार 682 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 77 हजार 893 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुणे महापालिकेने खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्कची गरज नसल्याचे सांगितले. मात्र, खासगी वाहनातून प्रवास करणारे प्रवासी हे एकाच कुटुंबातील असले पाहिजेत अशी अट घालण्यात आली आहे. तर दुचाकी चालवताना मास्क घालणे बंधन कारक असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले असून मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.