Pune News : पुणे शहरात दिवसभरात 98 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, एप्रिल पासून पहिल्यांदाच आकडा शंभरीच्या आत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात सोमवारी (दि.25) 98 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 205 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 385 स्वॅब तपासणी करण्यात आली. एप्रिलपासून पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरीच्या आत आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 205 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक रुग्ण हद्दीबाहेरील आहे. आतापर्यंत 4 हजार 739 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 025 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 84 हजार 780 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 78 हजार 016 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 76 हजार 277 रुग्णांपैकी 3 लाख 62 हजार 469 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 888 आहे. यामध्ये स्ट्रेन या नवीन कोरोना 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.33 टक्के आहे.