Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 225 नवे पॉझिटिव्ह तर 258 जणांना ‘डिस्चार्ज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात मंगळवारी (दि.26) 225 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 258 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 402 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 742 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 989 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 85 हजार 005 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यापैकी 1 लाख 78 हजार 274 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 76 हजार 547 रुग्णांपैकी 3 लाख 62 हजार 804 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 820 आहे. यामध्ये स्ट्रेन या नवीन कोरोना 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 923 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.35 टक्के आहे.