Pune News : पुणे शहरात दिवसभरात 128 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 168 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात बुधवारी (दि.27) 128 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 168 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 071 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 202 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 744 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 947 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 85 हजार 133 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 78 हजार 442 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 77 हजार 57 रुग्णांपैकी 3 लाख 63 हजार 276 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 852 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.35 टक्के आहे.