Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – coronavirus news updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 239 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त (coronavirus news updates) झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली. सध्या शहरामध्ये 3 हजार 320 इतके सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सक्री रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 73 हजार 539 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 61 हजार 763 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8456 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6076 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 519 रुग्ण गंभीर आहेत. तर 923 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज पर्यंत शहरात 25 लाख 67 हजार 412 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

हे देखील वाचा

‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : used maruti wagon r cng car with 1 year warranty here know how much it will cost