कोरोना व्हायरसचा ‘संसर्ग’ रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : कोहिनकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून, त्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरही नागरिकांचा उत्तम सहभाग मिळत आहे.
हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने गावात येणाऱ्या तीन्ही रस्त्यावर चेकपोस्ट उभारावेत. त्यांच्या मदतीसाठी पोलीस बंदोबस्त दिला जाईल. मेडिकल तपासणी करावी, येथून ये-जा करणाऱ्या वाहनांवर सॅनिटायजरची फवारणी करावी, तापमापकाच्या साहयाने प्रत्येक व्यक्तीचा ताप मोजावा, जर जास्त ताप असेल आरोग्य केंद्राला कळवावे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकरी संदीप कोहिनकर यांनी ग्रामपंचायतला आदेश दिले.

मांजरी खुर्द येथे कोहिनकर यांच्या नेतृत्वाखाली आज कोव्हीड 19 संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ सचिन खरात, वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, सरपंच प्रतिमा सचिन उंदरे, किशोर उंदरे, विकास उंदरे, महादेव उंदरे, सचिन आण्णा उंदरे, स्वप्निल उंदरे, हिरामण गवळी, समिर उंदरे, सोमनाथ आव्हाळे, अशोकराव आव्हाळे आदी उपस्थित होते.

कोहिनकर म्हणाले की, मांजरी गावासाठी 7 शिक्षक व 3 आशा वर्कर्स नेमले आहेत. या कामासाठी अधिकारी-कर्मचारी कमी पडत असतील, तर ते वाढवून दिले जातील. ग्रामपंचायतला या कामासाठी खर्चाच्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार खासगी रुग्णालये, ओपीडी, मेडिकल, गर्दीच्या ठिकाणी होतो त्यासाठी लक्ष द्यावे. औषध विक्री करणाऱ्यांनी दररोज विक्री केलेल्या औषधांची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कोट

मांजरी गावात सर्व कुटुंबांना साबण व सॅनिटायजरचे वाटप केले आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मागणी प्रमाणे गोळ्या, औषधे व साहित्य दिले आहे. गावात सोडीयम हायक्लोराईड जंतुनाशकाची फवारणी करुन घेतली. रेशन कार्ड नाही असे मजूर/ भाडेकरु 468 लोकांची शरद भोजन योजनेसाठी समावेश केला आहे. रोज 166 कुटुंबांचा सर्व्हे होत असून, त्यानुसार 2 मे रोजी गावची लोकसंख्या 6953, तर 1409 इतकी कुटुंबाची संख्या आहे.