Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळे 11 जणांचा मृत्यू तर 389 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना व्हायरसचं थैमान चालूच आहे. पुणे शहरातील कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 11 जणांचा बळी गेला आहे तर तब्बल 389 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुण्यात आतापर्यंत तब्बल 504 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे तर शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा आता 11854 वर पोहचला आहे.

पुणे शहरात सध्या 4086 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 7264 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात आढळून आलेल्या 389 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 4086 रूग्णांपैकी 273 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 52 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. पुणे शहरात आतापर्यंत 504 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडू नका, अति महत्वाचे काम असेल तर मास्क परिधान करा, सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळा असे आवाहन केले आहे.