Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं पुणे शहरात सध्या चिंतेचं वातावरण आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात तब्बल 617 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. आता पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 16742 वर जावुन पोहचली आहे.

पुणे शहरात आठवडयाभरापासून दररोज 500 हून अधिक नवे पॉझिटिव्ह रूग्ण समोर येत आहेत. गेल्या 24 तासामध्ये 617 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून 5 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 482 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 6195 आहे. आतापर्यंत तब्बल 9929 रूग्णांना डिस्चर्ज देण्यात आला असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुणे शहरात अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रूग्णांपैकी 333 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 61 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत पुणे शहरात 618 जणांचा बळी गेला आहे.