Coronavirus : दिलासादायक ! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3898 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसची लागण झालेले रूग्ण उपचारानंतर मोठया प्रमाणावर बरे होत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1791 रूग्ण बरे झाले आहेत तर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील तब्बल 2107 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात पुणे शहरात कोरोनामुळं 23 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुणे शहराबाहेरील 11 जणांचा देखील मृत्यू झाला आहे. कोरेानामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 1335 वर पोहचली आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3898 रूग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची सुख्या 55761 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये तब्बल 36914 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 17512 रूग्ण हे सक्रिय आहे. एकुण सक्रिय रूग्णांपैकी 638 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 389 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दरम्यान, दिवसभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठया प्रमाणावर रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 2107 रुग्ण कोरोनामुक्त
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र आज दिलासादयक आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात विक्रमी 2107 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरामध्ये आज दिवसभरात 903 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 439 वर पोहचली आहे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 903 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 हजार 063 एवढी झाली आहे.

आज आढळून आलेल्या 903 रुग्णांमध्ये 870 रुग्ण शहरातील तर 33 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 303 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 37 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 रुग्ण शहरातील आहेत तर 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 439 वर पोहचला आहे. यामध्ये 349 रुग्ण शहरातील तर 90 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात विक्रमी 2107 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 14 हजार 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3553 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये काळेवाडी, पिंपरी, निगडी, मोशी, मिलिंदनगर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाल्हेकरवाडी, रहाटणी, खेड, विशालगड पुणे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.