Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा ‘विस्फोट’ ! गेल्या 24 तासात 1812 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयातील हवेली, मुळशी तालुक्यासह इतर काही गावांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा तिसरा दिसता होता. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनाचे 1812 नवे पॉझिटिव्ह रूग्ण हे केवळ पुणे शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनामुळं तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला असून पुणे शहरात आतापर्यंत 906 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. दरम्यान, ॲंटिजेन किटद्वारे टेस्ट घेण्यात येत आहेत तसेच टेस्ट घेण्याची संख्या वाढवण्यात आली आहे.

पुणे शहरात सध्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 31884 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 20334 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात तब्बल 764 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या नव्या पॉझिटिव्ह 1812 रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रुग्णांचा समावेश आहे. सध्या पुणे शहरात एकुण 10644 रूग्ण हे अ‍ॅक्टीव आहेत. त्यापैकी 536 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 80 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 17 जणांचा मृत्यू झाल्याने आणि दिवसभरात 1812 कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळावेळी स्थानिक आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.