Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 31 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 1762 नवे पॉझिटिव्ह समोर आले आहेत. शहरात दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर पुण्यातच पण शहराबाहेरील 8 जण देखील दगावले आहेत. कोरेानामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 1366 वर पोहचली आहे. दिवसभरात 1203 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची सुख्या 57523 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये तब्बल 38117 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 18040 रूग्ण हे सक्रिय आहे. एकुण सक्रिय रूग्णांपैकी 639 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 392 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.