Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 1312 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात 1312 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1192 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराबाहेरील 2 जण कोरोनामुळं दगावले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत तब्बल 1412 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 59496 झाली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 41251 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 16833 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. सध्या अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रूग्णांपैकी 656 हे क्रिटिकल असून त्यापैकी 404 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. सध्या पुणे शहरात कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.