Coronavirus दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1159 कोरोनामुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता थोडया प्रमाणावर कमी होत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण उपचारानंतर बरे होण्याच्या प्रमाणात बर्‍यापैकी वाढ झालेली आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात 1159 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात 1101 नवे पॉझिटिव्ह आढळले असून शहरातील 17 जणांचा कोरोनामुळं आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेर 11 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. आता पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 1429 पर्यंत जावून पोहचला आहे.

सध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 60597 एवढी आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 42410 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 16758 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 675 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 425 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.