Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1168 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 1168 जण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, दिवसभरात कोरोनाचे 1249 नवे पॉझिटिव्ह समोर आले असून पुणे शहरातील 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त पुणे शहराबाहेरील 8 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनामुळं आतापर्यंत तब्बल 1479 जणांचा मृत्यू झाला आहे.


पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 63286 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 44774 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 17033 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. आज दिवसभरात 1168 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर 1249 नवे रूग्ण आढळून आले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह असलेल्या रूग्णांपैकी 703 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 439 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.