Coronavirus : दिलासादायक ! गेल्या 24 तासात पुण्यात 1879 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनानं कंबर कसली आहे. दिवसेंदिवस कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह देखील मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरातील तब्बल 1879 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1390 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 24 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्या बाहेरील 12 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या 1540 झाली आहे.

सध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 65966 आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 48614 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 15812 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 726 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 448 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाणावर मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रूग्ण अद्यापही मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.