Coronavirus : पुण्यात लॉकडाऊनचा पहिला दिवस अन् ‘कोरोना’च्या 750 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर, 25 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयातील हवेली, मुळशी तालुक्यासह इतर काही गावांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा पहिला दिसता होता. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनाचे 750 नवे पॉझिटिव्ह रूग्ण हे केवळ पुणे शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनामुळं तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून पुणे शहरात आतापर्यंत 874 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे.

पुणे शहरात सध्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 29107 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 18824 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात तब्बल 728 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या नव्या पॉझिटिव्ह 750 रूग्णांपैकी 12 रूग्ण हे ससून, 532 रूग्ण हे नायडू तर 206 रूग्ण हे इतर खासगी रूग्णालयातील आहेत. सध्या पुणे शहरात एकुण 9409 रूग्ण हे अ‍ॅक्टीव आहेत. त्यापैकी 513 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 198 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याने आणि दिवसभरात 750 कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळावेळी स्थानिक आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like