Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा ‘प्रकोप’ ! गेल्या 24 तासात 29 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा 7 था दिवस होता. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनाचे 1817 नवे पॉझिटिव्ह रूग्ण हे केवळ पुणे शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनामुळं तब्बल 29 जणांचा मृत्यू झाला असून पुणे शहरात आतापर्यंत 1005 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीबाहेरचे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ॲंटिजेन किटद्वारे टेस्ट घेण्यात येत आहेत तसेच टेस्ट घेण्याची संख्या वाढवण्यात आली आहे.

पुणे शहरात सध्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 39203 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 23441 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात तब्बल 830 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या नव्या पॉझिटिव्ह 1817 रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रुग्णांचा समावेश आहे. सध्या पुणे शहरात एकुण 14757 रूग्ण हे अ‍ॅक्टीव आहेत. त्यापैकी 591 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 96 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 29 जणांचा मृत्यू झाल्याने आणि दिवसभरात 1817 कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळावेळी स्थानिक आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.