Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा हाहाकार, आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आला समोर, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1147 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 19 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 1147 रूग्णांपैकी ससूनमधील 16, नायडूमधील 793 आणि खासगी रूग्णालयातील 338 रूग्णांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह असलेल्यांपैकी 401 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी तब्बल 79 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 8400 वर जावून पोहचली आहे.

दरम्यान, आज दिवसभरात 587 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. आता पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 24168 आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 14998 रूग्ण हे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 770 जणांचा बळी गेला आहे.