Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील चोरीला गेलेले ‘स्पिकर’ 18 लाखांचे; बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

एक कोटी रुपयांच्या बोगस बिलांच्या फाईल्स ‘ऑडीट’ विभागात इनवर्ड झाल्याच्या नोंदी आढळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune Corporation | बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील (lokshahir annabhau sathe natyagruha) चोरीला गेलेले ते ‘साउंड स्पीकर’ १८ लाख रुपये किंमतीचे होते. यासंदर्भात येत्या काही तासांत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात (Bibvewadi Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने (Pune Corporation) दिली.

 

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील (Anna Bhau Sathe Auditorium, Bibvewadi, Pune) २ कोटी रुपये किंमतीचे साउंड स्पिकर चोरीला
गेल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप (corporator subhash jagtap) यांनी नुकतेच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केला होता.
याप्रकरणी गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात येईल.
असे आश्‍वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते.
त्यानुसार पालिका प्रशासनाने (Pune Corporation) मागील तीन दिवसांत पोलिसांनी मागितलेली आवश्यक ती तांत्रिक माहिती गोळा केली आहे.
ती माहिती तक्रारीसह बिबवेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा.
याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कळविण्यात आले असून येत्या काही तासांत गुन्हा दाखल करण्यात येईल.
अशी माहिती महापालिकेच्या (PMC) क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष वारूळे (Santosh Warule) यांनी दिली.

 

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये (annabhau sathe smarak) कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक साउंड सिस्टिम (Sound System) बसविण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते.
मागील महिन्यांत नाट्यगृह सुरू करण्यात आल्यानंतर विद्युत विभागाच्या तपासणीदरम्यान या नाट्यगृहातील साउंड सिस्टिममधील बॉश कंपनीचे (bosch company)
स्पीकर चोरून नेल्याचे व त्याठिकाणी बनावट स्पीकर बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले.
विद्युत विभागाने ही बाब सांस्कृतिक विभागाला कळविली देखिल, परंतू त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
दरम्यान, नुकतेच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये (PMC GB Meeting) नगरसेवक सुभाष जगताप यांनी नाट्यगृहातील साउंड स्पीकर चोरीला गेल्याचा गौप्यस्फोट केल्याने खडबडून झालेल्या प्रशासनाने (Pune Corporation) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

कोरोना काळात बंद राहीलेल्या महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये खुर्च्यांची मोडतोड, सीसी टीव्ही कॅमेरे चोरून नेण्याचेही प्रकार घडले आहेत.
कोरोना काळात सर्व यंत्रणा प्रतिबंधात्मक कारवाई असताना चोरट्यांनी किंमती वस्तुंवर हात साफ केला तर तळीरामांनीही याठिकाणी पार्ट्या झोडल्याचे दारूच्या बाटल्यांच्या राशींवरून निदर्शनास आले. विशेष असे की सर्व नाट्यगृहांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा देखिल आहे.
परंतू प्रशासनाने अद्याप या घटकांकडे साधी चौकशी तर सोडाच पण सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेष असे की कोरोना काळात बहुतांश नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांमध्ये कामगार वर्गासाठी शिधा गोळा करणे.
आवारात तात्पुरते उपचार केंद्र, क्वारंटाईन सेंटर, स्वॅब सेंटरही सुरू करण्यात आले होते.
त्यामुळे बंदच्या काळातही सातत्याने वर्दळ असताना काही फूट उंचीवर असलेल्या साउंड सिस्टिममधील स्पिकर काढून त्याठिकाणी डुप्लीकेट स्पीकर बसविणे यासारख्या घटना घडल्याने ‘कुंपणच शेत खात असल्याचा’ संशय बळावला आहे.

 

विद्युत विभागाकडील बोगस बिलाच्या त्या फाईल ‘ऑडीट’ विभागात आल्याच्या ‘एन्ट्री’ सापडल्या

 

कोरोना काळात शहरातील स्मशानभूमींमध्ये विद्युत विषयक कामे केल्याची सुमारे एक कोटी रुपयांची बनावट बिले दाखल झाल्याप्रकरणी संशयित ठेकेदार मे. आशय इंजिनिअर्स ऍन्ड असोसिएटसचे योगी मोरे व ही बिलांची फाईल सर्व टेबलवर फिरवण्यासाठी लायजनींग करणारा त्याचा साथीदार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे.
विशेष असे की आतापर्यंत आमच्या विभागाकडून ही फाईल पुढे गेलीच नसून स्वाक्षर्‍याही बनावट असल्याचा खुलासा विद्युत विभागाच्या संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी केला आहे.
तसेच ऑडीट विभागानेही सुरवातीलाच ऑडीट विभागाकडे आलेल्या फाईलवरील सह्या व शिक्के बनावट असल्याचे सांगत हातवर केले आहेत.
परंतू या बिलांच्या चार फाईल्सपैकी तीन फाईल्स ऑडीट विभागाकडे इनवर्ड झाल्याच्या नोंदी मिळाल्याने ऑडीट विभागातील संबधित कर्मचारी देखिल अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान विद्युत विभागाने मे. आशय इंजिनिअर्सची कामे महापालिकेच्या कोणत्याही विभागात सुरू असतील तर ती तत्काळ बंद करावीत आणि त्याची बिले अदा करू नयेत.
असे पत्र सर्वच विभागांना पाठविले आहे.

 

Web Title : Pune Corporation | 18 lakh stolen ‘speaker’ from Lokshahir Annabhau Sathe Natyagruha; The process of filing a case at Bibwewadi police station is underway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी CBI कडे सोपवा’

‘ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी’सह 57 kmpl मायलेजची Suzuki Access 125 खरेदी करा अवघे 9 हजार देऊन, इतका होईल EMI

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 61 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी