Pune Corporation | उरूळी देवाची व फुरसुंगी येथील 650 हेक्टरवरील 3 टी. पी. स्किमचा प्रारुप आराखडा लवकरच प्रसिद्ध होणार; प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) येथील सुमारे ६५० हेक्टर जागेवरील नियोजीत तीन टीपी स्किमचा प्रारुप मसुदा (आराखडा) Draft of TP Scheme तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी तो प्रसिद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे (PMC General Body Meeting) आला आहे. गुरूवारी (दि. १०) होणार्‍या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने करण्यास मदत होणार आहे. (Pune Corporation)

 

पुणे महापालिकेने उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट गावांमधून जाणार्‍या ११० मी. व सुधारीत ६५ मी. रुंदीच्या बाह्य वळण मार्गाच्या दुतर्फा टीपी स्कीम (PMC TP Scheme) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१९ मध्ये यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. सुमारे ६५० हेक्टर क्षेत्रावर तीन टीपी स्किम राबविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता तसेच कोरोनामुळे प्रारुप आराखडा तयार करण्यास विलंब झाला आहे. हा प्रारुप आराखडा तयार झाला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन योग्य त्या दुरूस्त्या केल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. (Pune Corporation)

 

पालिका प्रशासनाने मागील तीन वर्षांच्या कालावधीत तीन टी. पी. स्कीमसाठी मे. डिझाईन पॉईंट कन्स्ल्टंट प्रा. लि. (Design Point Consult Pvt Ltd) यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली.
नगर रचना कायद्यातील तरतुदींनुसार टी. पी. स्किम क्षेत्रातील मिळकतधारकांसोबत बैठका घेउन स्किमचे महत्व व त्यातून मिळणार्‍या सोयी सुविधांची माहिती दिली.
तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात पीएमआरडीएचा विकास आकाखडा तयार करताना येथील बाह्यवळण मार्गाची रुंदी ११० मी. वरून ६५ मी. पर्यंत कमी केली आहे.
ही बाबही संबधित नागरिकांच्या निदर्शनास आणून देउन टी. पी. स्किमचा दुरूस्त आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी तो प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

 

या आहेत टी. पी. स्किम

१. टी. पी. एस. ६ – उरूळी देवाची – १०९.७८ हेक्टर

२.  टी. पी. एस. ९ – फुरसुंगी – २६०.६७ हेक्टर

३. टी. पी. एस. १० – फुरसुंगी – २७९.७१ हेक्टर

 

Web Title :- Pune Corporation | 3 TPs on 650 hectares at Uruli Devachi and Fursungi The draft plan of the scheme will be published soon Before the general meeting of the corporation for approval of the proposal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा