Pune Corporation | कात्रज परिसरातील ‘उत्कर्ष’ मधील नागरिकांचा जीव धोक्यात; आधी रस्ता नंतर ‘ड्रेनेज’साठी खोदाई

'खड्डेमय' रस्त्यांमुळे अपघात

पुणे / कात्रज – पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | कात्रज (Katraj) येथील पेशवे तलावा (Peshwa Lake) लगत असलेल्या उत्कर्ष सोसायटीतील (Utkarsh Society)  रस्त्याची ‘ महापालिका (Pune Corporation) प्रशासनाने ‘ अक्षरशः  ‘चाळण’ केली आहे. अत्यंत टुकार नियोजनामुळे काही महिन्यांपूर्वी केलेल्या येथील मुख्य रस्त्याच्या कामानंतर रस्ता फोडून ऐन पावसाळ्यात ड्रेनेज लाईनचे (Drainage Line) काम करण्यात आले आहे. या कामानंतर अद्याप खड्डे बुजवण्यात आले नसल्याने चिखल आणि खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात (Accident) होत आहेत.

कात्रज येथील पेशवे तलावा समोरच उत्कर्ष सोसायटी (Katraj Utkarsh Society) असून या परिसरात मागील काही वर्षात अनेक अपार्टमेंट आणि बंगले बांधले असून मोठयाप्रमाणात नागिरक राहात आहेत.  याठिकाणी लोकसंख्येचा विचार करून अंतर्गत रस्ते सिमेंट चे तर मुख्य रस्ता डांबरी करण्यात आला आहे. या मुख्य रस्त्याचे अवघे 7 – 8 महिन्यांपूर्वी काम करण्यात आले आहे.

परंतु डांबरीकरनांनंतर अवघ्याच काही महिन्यात रस्त्याच्या मध्यभागातून ड्रेनेज लाईन  (Drainage Line) विकसित करण्यात आली आहे. विशेष असे की पावसाळ्यापूर्वी हे काम हाती घेण्यात आले. यासाठी मध्यभागीच रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र ड्रेनेज लाईन चे काम झाल्यानंतर अद्याप रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. खोदाई नंतर राडारोडा उचलण्यात आला आहे, मात्र काही प्रमाणात माती तशीच असल्याने पावसाळयात उर्वरित रस्ता निसरडा झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकी घसरून सातत्याने किरकोळ अपघात (Accident)  होत आहेत.

ड्रेनेज लाईनचे काम मुख्य खात्याकडून सुरू असून रस्त्याचे काम नगरसेवकाच्या निधीतून करण्यात आले आहे.
प्रशासनाला ड्रेनेज लाईनचे काम करायचे होते तर रस्त्याचे काम करण्याची घाई करण्याचे कारण न्हवते.
यामुळे रस्त्याच्या कामासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये वाचले असते.
केवळ अनियोजित कामामुळे लाखो रुपये वाया तर गेलेच परंतु नागरिकांना
मनःस्ताप ही सहन करावा लागत आहे.

Web Title :  Pune Corporation | Accident due to ‘gravel’ roads digging for drainage
first after road after endangering the lives of citizens of Utkarsh Society at Katraj

Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि
संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार,
नवी नियमावली जाहीर

Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक
पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार