Pune Corporation | पुण्यातील अनधिकृत ‘होर्डींग्ज’वर होणार कारवाई, दंड वसुली आणि होर्डींग्जचे नियमितीकरणासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करणार – मनपा आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई तसेच नियमांत बसणार्‍या होर्डींग्जधारकांकडून परवाना शुल्क वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अनधिकृत होर्डींग्ज शोधण्यासाठी लवकरच ‘एजन्सी’ नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी दिली.

पाचशे चौरस कि.मी.चे आकारमान असलेल्या पुणे शहरामध्ये पाच हजारांहून अधिक होर्डींग्ज अर्थात जाहिरात फलक आहेत.

खाजगी इमारती, इमारतींच्या ओपन स्पेस आणि रस्त्यांच्या कडेला दर्शनी भागांमध्ये प्रामुख्याने हे आवाढव्य होर्डींग्ज (pmc hoarding policy) उभारण्यात आले आहेत.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचा परवाना घेउन उभारण्यात येणार्‍या होर्डींगसाठी प्रति चौ.फूट २२२ रुपये दर आकारण्यात येतो.

परंतू शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे तसेच परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होर्डींग्ज उभारल्याचेही वेळोवेळी उघडकीस आले असून महापालिकेने (Pune Corporation) त्यावर कारवाई देखिल केली आहे.

पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये अनधिकृत होर्डींग्ज ही महापालिकेची नेहमीच डोकेदुखी ठरली आहेत. यासाठी महापालिकेने पाच वर्षांपुर्वी होर्डींग पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेतला.
या पॉलिसीनुसार महापालिकेला दरवर्षी ५० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळेल, असा विश्‍वासही त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.
परंतू हक्काचे उत्पन्न मिळवून देणार्‍या या पॉलिसीची अद्याप म्हणाविशी अंमलबजावणी होउ शकलेली नाही. किंबहुना साडेचार वर्षांपुर्वी महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने होर्डींग्जमधून मिळणार्‍या उत्पन्नाकडे कानाडोळाच केला आहे.

 

दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी होर्डींग्जमधून उत्पन्नासोबतच शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.
शहरात असलेल्या होर्डींग्जचे सर्वेक्षण करणे. अनधिकृत होर्डींग्ज लावलेल्यांकडून दंड वसुल करणे तसेच नियमित होउ शकणार्‍या होर्डींग्जचे नियमितीकरण करणे यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. शहराचा विस्तार आणि आकाशचिन्ह विभागातील कर्मचार्‍यांची संख्या विचारात घेउन हे काम स्वतंत्र एजन्सी मार्फत करण्यात येणार आहे.
याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दुजोरा दिला आहे.
ते म्हणाले, अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई (action on illegal hoardings in pune)
करून नियमित होउ शकणारे होर्डींग्ज परवाना शुल्क आकारणी करून नियमित करण्यात येतील.
तसेच जाहिरात धोरणाचीही कडक अंमलबजावणी करण्यात येईल.

 

Web Title : Pune Corporation | Action will be taken against unauthorized hoardings in Pune, recovery of fines and regularization of hoardings. Will appoint an independent agency – Municipal Commissioner Vikram Kumar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | आकाश भापकर टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई; आतापर्यंत 54 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

Pune Dam Water Level | पुण्याच्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे 100 % भरली; 11 धरणे ‘ओव्हर फ्लो’

Ajwain Water 5 Benefits | वजन कमी करायचे असो किंवा अनियमित मासिक पाळीची समस्या असो, रोज प्या ओव्याचे पाणी