Pune Corporation | महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे महापालिकेचे (Pune Corporation) सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक (Dnyaneshwar Molak) यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील आदेश आज दिले. महापालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्तपदाची एक जागा रिक्त असून मोळक यांच्या माध्यमातून ही जागा भरण्यात (Pune Corporation) आली आहे.

महापालिकेमध्ये अभियंता म्हणून नोकरीस सुरूवात केलेल्या मोळक यांनी महापालिकेच्या (Pune Corporation) विविध विभागामध्ये काम पाहीले आहे. परिमंडळ उपायुक्त तसेस घनकचरा विभागामध्ये त्यांनी प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली आहे. विविध सामाजिक कार्यात सहभागी होणारे मोळक संपुर्ण शहरात परिचित आहेत. मोळक यांच्यापुर्वी सह आयुक्त सुरेश जगताप (Suresh Jagtap) यांच्या रुपाने महापालिकेच्या अधिकार्‍याला अतिरिक्त आयुक्तपदी संधी मिळाली होती. जगताप हे काही महिन्यांपुर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदाची एक जागा रिक्तच होती.

Web Tital : Pune Corporation | Appointment of Dnyaneshwar Molak as additional Commissioner in PMC

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! या पध्दतीनं मिळेल एक लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या सोपी पद्धत 

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये