Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

पुणे – निविदांमधील रिंग, लाच प्रकरणी छापे, अनावश्यक खरेदी, ठराविक ठेकेदारांना कामे मिळावीत यासाठी प्रयत्न, काम न करताच ठेकेदारांना अदा करण्यात येणारी बिले यामुळे भ्रष्टाचाराची (Corruption In PMC) बजबजपुरी होत असलेल्या महापालिकेमध्ये (Pune Corporation) नवा खळबळजनक घोटाळा उघडकीस आला आहे. कोरोना काळातील गडबडीचा फायदा घेत महापालिकेने ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या निविदा काढल्या नसतानाही ठेकेदाराने ‘एक कोटी’ रुपयांचे बिल सादर केले. विशेष असे की, अगदी ही बिले इनवर्ड करतानापासून अगदी ऑडीट होईपर्यंतच्या साखळीतील सर्व टेबल्सवरील अधिकार्‍यांच्या सही शिक्क्यांसह या फाईल्सचा प्रवास झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती महापालिका (Pune Corporation) प्रशासनाने दिली आहे.

यासंदर्भातील माहिती अशी की, कोव्हीड १९ च्या अनुषंगाने वैकुंठ स्मशानभूमी आणि हडपसर (Hadapsar) येथील अमरधाम (Amardham) स्मशानभूमीमध्ये वायरींगची कामे केल्याची सुमारे एक कोटी रुपये रकमेची चार बिले मे. आशय इंजिनिअरींग व असोसिएटस यांनी विद्युत विभागाकडे सादर केली. विद्युत विभागाच्या इनवर्ड क्लर्कने ती दाखल करून घेतल्यानंतर तिचा प्रवास कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता असा होउन अगदी ऑडीट विभागापर्यंत झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. विशेष असे की जानेवारी महिन्यांत केलेल्या या कामांसाठीची ही बिले व संबधित कागदपत्र या फाईलमध्ये आहेत. यावर ऑडीट विभागाचा बिलड् असा शिक्काही आहे. परंतू या कामाची निविदा व प्रत्यक्ष बिलामध्ये टाकण्यात आलेल्या निविदेचा क्रमांक वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपुर्ण कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्यात आली. तसेच या कामाशी संबधित आरोग्य विभागासोबतही चर्चा विनिमय करण्यात आल्यानंतर ही बोगस बिले असल्याचे विद्युत विभागाच्या (Pune Corporation) निदर्शनास आले.

Medicine Price Hike | रुग्णांना बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती सुमारे 40 टक्क्यांनी महागल्या

दरम्यान, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी या फाईल्सवर स्वाक्षरी असलेल्या अगदी क्लार्कपासून वरिष्ठ अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावेळी अशा प्रकारची फाईल्स आपल्याकडे दाखलच झाली नाही, तसेच त्यावर स्वाक्षरीही आपली नाही असा खुलासा प्रत्येकाकडून आल्यानंतर प्रशासन ‘हँग’ झाले. तपासणी केल्यावर फाईलमधील काही कागदपत्रांवर जावक क्रमांक आणि तारखाही नसल्याचे समोर आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी याची गंभीर दखल घेत याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

निविदा काढली नसतानाही कामाची बिले सादर झाल्याने याप्रकरणी संशय आला. त्यामुळे सखोल चौकशी केल्यानंतर फाईलशी संबधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी बिलांवर आपल्या स्वाक्षर्‍या नसल्याचे सांगितले. संबधित ठेकेदाराला यापैकी एकही बिल अदा करण्यात आलेले नाही. ठेकेदाराकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यानेही प्राथमिक चौकशीमध्ये या बिलांचा आपला संबध नसल्याचे सांगितले. बिलांवरील सह्या, शिक्के, यासंदर्भातील कागदपत्र कोठे तयार करण्यात आली, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, यामागील सूत्रधार कोण? याचा तपास करण्यासाठी महापालिका (Pune Corporation) आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

– श्रीनिवास कंदुल Shreeniwas Kandul (मुख्य अभियंता, विद्युत विभाग)

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ? समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकरनं केली पोलिसांकडे तक्रार

EPFO ने कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम केली दुप्पट; जाणून घ्या आता किती मिळेल फंड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Corporation | bill of 1 cr without tender show to PMC, corruption in pmc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update