Pune Corporation | चार वर्षात ठेकेदारांच्या टँकरच्या फेर्‍या झाल्या ‘दुप्पट’ ! पुण्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढतेय की पालिकेलाच लागलीय ‘गळती’

पुणेपोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation |शहरात मागील चार आर्थिक वर्षामध्ये ‘टँकर’ने (Tanker)  पाणी पुरवठ्याचे (Water Supply) प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने ठेकेदारी पद्धतीने घेतलेल्या टँकरच्या फेर्‍या चार वर्षामध्ये दुप्पट झाल्या असून खाजगी टँकरच्या फेर्‍या निम्म्यावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चार वर्षे धरणे फुल्ल असताना वाढलेल्या टँकर फेर्‍यांमुळे ‘शहरात पाणी समस्या’ (Water Problem) बिकट असल्याचे समोर येत आहे. पुणे शहराला (Pune City) खडकवासला धरण ( Khadakwasla Dam) साखळीतून पाणी पुरवठा (Water Supply) होत आहे. पुणे महापालिका (pune corporation) पुणे शहरासोबतच पुणे व खडकी कॅन्टोंन्मेट बोर्ड, (Khadki Cantonment Board) रेल्वेलाही (Railways) पाणी पुरवठा करते. यासोबतच शासन निर्णयाप्रमाणे १९९९ पासून महापालिका (pune corporation) हद्दीलगतच्या पाच कि.मी. परिसरातील गावांनाही पाणी पुरवठा करत आहे.

पुणे शहराचा भौगोलिक आकार बशीसारखा असल्याने सखल भागात मुबलक तर उंचावरील व प्रामुख्याने शहराच्या पुर्व, पश्‍चिम व दक्षिण भागातील उंचावरील भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने वडगाव शेरी, (Wadgaon Sheri) खराडी, (Kharadi) हडपसर, (Hadapsar) कोंढवा, (Kondhwa) कात्रज,(Katraj)  बाणेर, (Baner) बावधन (Bavdhan) हा परिसर पुर्वीपासून पुरेशा पाण्यापासून वंचित राहीला आहे. तर मंतरवाडी येथील कचरा डेपोमुळे (Garbage Depot) भुगर्भातील पाणी दुषित झाल्याने या परिसरातील गावांना दररोज २०० टँकर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

महापालिकेचे स्वत:चे टँकर असून महापालिका ठेकेदारी पद्धतीनेही टँकरने पाणी पुरवठा करत असून यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतू २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून दररोज टँकरच्या खेपा वाढत गेल्याचे पाहायला मिळत आहे. २०१७-१८ मध्ये महापालिकेच्या टँकरच्या २१ हजार २४४, ठेकेदाराकडील टँकरच्या १ लाख १ हजार ४५८ आणि खाजगी टँकर चालकांच्या ७५ हजार ५३० खेपा अशा १ लाख ९८ हजार २३२ खेपा झाल्या होत्या. तर २०२०-२१ मध्ये महापालिकेच्या टँकरच्या २६ हजार ९३४ , ठेकेदाराकडील टँकरच्या १ लाख ९६ हजार ५३९ तर खाजगी टँकरच्या ४४ हजार ४०३ अशा २ लाख ६७ हजार ८७६ खेपा झाल्या आहेत. विशेष असे की २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे अनेक आस्थापना बराच काळ बंद होत्या. तर कोरोनावरील उपचारासाठी अनेक ठिकाणी सुविधा करावी लागल्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. तरी देखिल टँकरच महापालिका, ठेकेदार तसेच खाजगी टँकरच्या खेपा मात्र आदल्या वर्षीच्या तुलनेत या काळात कमी झाल्या होत्या.

एकंदरच मागील चार वर्षात महापालिकेच्या टँकरच्या खेपा जेमतेम वाढत असताना ठेकेदाराकडील (Contractor) टँकरच्या खेपा जोमाने वाढत गेल्या असून खाजगी टँकरच्या खेपा मात्र निम्म्याने कमी झाल्या आहेत. विशेष असे की मागील चारही वर्षात पुरेसे पर्जन्यमान राहीले असून धरणेही परिपुर्ण भरली होती. मागील चार वर्षात बांधकाम क्षेत्रात मंदीची परिस्थिती असल्यानेही पाण्याच्या मागणीचाही ओघही कमी असणे साहाजिकच होते.
असे असताना टँकरच्या खेपा वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहरात चोवीस तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे.
येत्या काळात ही योजना सुरू झाल्यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्याची तितकीशी गरज राहाणार नाही.
तसेच टँकरने होत असलेल्या पाणी पुरवठ्याचा फेर आढावा घेउन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

– अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक, पाणी पुरवठा विभाग.

टँकरची संख्या
वर्ष              मनपा       ठेकेदार          खाजगी       एकूण
२०१७-१८     २१,२४४    १,०१,४५८   ७५,५३०       १,९८,२३२
२०१८-१९     २३,५७३    १,३९,९०३   ६०,१४१       २,२३,६१७
२०१९-२०     २६,५४१    १,९३,६८२   ६३,३१८       २,८३,५४१
२०२०-२१     २६,९३४    १,९६,५३९   ४४,४०३       २,६७,८७६

Web Title : Pune Corporation | Contractor tanker rounds ‘doubled’ in four years! Water scarcity is increasing day by day in Pune.

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

Lalbaugcha Raja  | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट!
भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

Pregnancy | प्रेग्नंसीत ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने मुल गोरे होते का? या काळात सेक्स करावा का?
जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट