Pune Corporation | मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘खाचखळग्यांचा’ त्रासाची डेडलाईन 10 फेब्रुवारीपर्यंत; 20 जानेवारीची डेडलाईन हुकली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवरील रस्ते खोदाई आणि रस्त्यांचे पुर्नडांबरीकरणाच्या कामाची स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (PMC Standing Committee Chairman Hemant Rasne) यांनी दिलेली ‘डेडालाईन’ पुन्हा हुकली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘खाचखळग्यांचा’ (potholes in pune) त्रास पुढील तीन आठवडे पुणेकरांना सोसावा लागणार आहे. (Pune Corporation)

 

शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील ५० वर्षे जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे तसेच चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम सात महिन्यांपुर्वी हाती घेण्यात आले आहे. कोरोनाच्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर मागीलवर्षी असलेल्या लॉकडाउनमध्ये सुरू करण्यात आलेले काम लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर तसेच पावसाळ्यात काहीशा धिम्या गतीने सुरू राहीले. लॉकडाउन हटल्यानंतर शहरातील रस्त्यांवरील गर्दी वाढल्याने या कामांसाठी केलेल्या खोदाईमुळे सद्यस्थितीत खाचखळग्यांच्या रस्त्यांवरून वाहतूक सुरू असल्याने गती मंदावली आहे. तसेच ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष व स्थानीक नगरसेवक हेमंत रासने यांनी प्रशासनाच्या विविध विभागांचा सातत्याने आढावा घेत १० जानेवारीपर्यंत मध्यवर्ती भागातील सहा प्रमुख रस्त्यांवरील खोदाईची कामे १० जानेवारीपर्यंत तर रस्त्यांचे डांबरीकरण २० जानेवारीपर्यंत करण्याची डेडलाईन दिली होती. विशेष असे की प्रशासनाने दिलेल्या माहितीवरूनच रासने यांनी ही डेडलाईन जाहीर केली होती. (Pune Corporation)

 

मात्र, खड्डे खोदाईची डेडलाईन उलटून आठवडा झाल्यानंतरही शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर काही ठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. तसेच टिळक व लक्ष्मी रस्त्याच्या काही भागाचेच आतापयर्र्त डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाची डेडलाईन २० जानेवारी असून पुढील तीन दिवसांत उर्वरीत कामे होणे जवळपास अशक्यच असल्याचे समोर आले आहे. चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या मुख्य वाहीनीवरून कनेक्शन देणे व त्यांचे चेकींग झाल्यानंतरच रस्त्याचे काम करावे लागणार आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी पथ विभागाकडे निधी नसल्याने पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाकडून निधी वर्गीकरण करणे, निविदा काढून त्यांना मंजुरी व वर्क ऑर्डर देणे या कामांना किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याची बाब समोर आली आहे.

मध्यवर्ती भागातील ५० वर्षे जुनी ड्रेनेजलाईन बदलणे, पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन टाकणे ही मोठी कामे आहेत. अरूंद रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी कामे करण्यास मर्यादा येत आहेत त्यामुळे काहीसा विलंब होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. घाई गडबडीत काम केल्याने कामाचा दर्जा खालावून वारंवार बिघाड होण्यात अर्थ नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार व्हावे यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. टिळक रोड व लक्ष्मी रस्त्याचे ४०० मीटरहून अधिक डांबरीकरणाचे काम झाले आहे. कामांचा आढावा घेतल्यानंतर १० फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे पुर्ण करावीत, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

 

– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.
(PMC Standing Committee Chairman Hemant Rasne)

 

पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन्स टाकण्यासाठी सहा टप्प्यांमध्ये ३० जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. नियोजनाप्रमाणे १५ जानेवारीपर्यंतचे काम झाले आहे. उर्वरीत कामही ३० जानेवारीपर्यंत पुर्ण होईल. मुख्य वाहनीवरून कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजीराव रस्ता व शिवाजी रस्त्यावर काही ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. ही कनेक्शन दिल्यानंतर ट्रायलही घ्यावी लागणार आहे. रस्त्यांच्या कामांसाठी पथ विभागाला पाणी पुरवठा विभागाकडून ४ कोटी व ड्रेनेज विभागाकडून २ कोटी असा ६ कोटी रुपयांचा निधी वर्गीकरण करून दिला आहे. – अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग.

पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाकडून रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
रस्त्यांच्या कामांची शॉर्ट टेंडर्स काढण्यात येतील. ज्यादिवशी पाणी पुरवठा विभागाचे सर्व काम होईल,
त्यानंतर पुढील दहा दिवसांत सर्व रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात येतील.

 

– व्हि.जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पथ विभाग.
(V.G. Kulkarni, Superintendent Engineer, Path Division)

 

Web Title :- Pune Corporation | Deadline for potholes on major city streets until February 10; January 20 deadline missed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Corporator Vasant More | खासदार निधीतून बसविलेली 15 टॉयलेटस् बंद अवस्थेत; उभारण्यासाठी केलेला 2 कोटींचा खर्च संबधित लोकप्रतिनिधींकडून वसुल करावा – मनसेची मागणी

 

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात 3959 नवीन रुग्णांचे निदान, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | पुण्यातील यवतमध्ये गॅस कटरने महाराष्ट्र बँकेचे ATM फोडले, चोरट्यांचा भल्या पहाटे 23 लाखांवर डल्ला