Pune Corporation | भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ‘गोलमाल’; खोटे बिल काढल्याप्रकरणी उपअभियंता टुले निलंबित तर कनिष्ठ अभियंत्याची खातेनिहाय चौकशी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात (Bhavani Peth Regional Office) पादचारी मार्गाची दुरुस्ती, काँक्रिटीकरण, नवीन पादचारी मार्ग तयार यासह इतर कामात अनागोंदी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तपासणी केली असता कामे न करताच बिले अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी उप अभियंता बाळासाहेब टुले (Deputy Engineer Balasaheb Tule) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले असून त्यांची विभागीय तर कनिष्ठ अभियंता सिमरन पिरजादे (Junior Engineer Simran Pirzade) यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने तीन ठेकेदारांना काळ्या यादीत (Blacklisted) टाकले आहे.

पुणे महानगर पालिकेने मे. रेणुक एंटरप्रायझेस (Molecular Enterprises), मे. गणेश प्रोप्रायटर (Ganesh Proprietor), मे. सद्गुरू एंटरप्रायझेस (Sadguru Enterprises)
या तीन ठेकेदार कंपन्यांना काळ्या यादीत (Three contractors blacklisted) टाकण्यात आले
असून यापूर्वी ज्या ठेकेदारांना काळ्यायादीत टाकले आहे,
त्यांच्याकडून पैशाची वसुली लवकरच होणार आहे.

 

 

खोटे बिल (false billing) काढल्याप्रकरणाची परिमंडळ पाचचे उपायुक्त अविनाश संकपाळ (Deputy Commissioner Avinash Sankapal) यांना चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Deputy Commissioner Avinash Sankapal) यांनी दिले आहेत.
यांदर्भात बोलताना संकपाळ म्हणाले, टुले आणि पिरजादे यांची चौकशी सुरु करून लवकरच अहवाल सादर केला जाईल.
तर फाइल गायब केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार (FIR) दिली आहे, अद्याप त्यातूनही पुढे काही आले नाही.

दरम्यान, प्रत्यक्ष जागेवर काम न करताच 100 टक्के बिल ठेकेदाराला आदा केल्याचे समोर आले आहे.
नेमकी तीच फाईल गायब झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
गायब करण्यामध्ये माननियांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गृहमंत्र्यांकडे तक्रार

कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Assembly constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्याध्यक्ष गणेश नलावडे, आनंद सावणे, संतोष नांगरे यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे.
कामे न करता बीले काढल्याचा उद्योग केल्याने महापालिकेने तीन ठेकेदारांना काळया यादीत टाकले आहे. पण, अशा प्रकारांना खतपाणी घालणारे महापालिकेचे अधिकार, कर्मचारी आणि नगरसेवकांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्याकडे दिले आहे.

 

Web Title :  pune corporation | deputy engineer balasaheb tule suspended for false billing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Svanidhi Yojana | खुशखबर ! फेरीवाल्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देऊ शकतं रोख 10000 रूपये

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये झाली वाढ, जाणून घ्या कोण-कोणत्या राज्यात कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल वाढ

Pune Crime | चऱ्होली येथील श्री वाघेश्वर महाराज मंदिरातील चोरी