Pune Corporation | मैलापाणी शुध्दीकरणातील ऑनलाईन कंटीन्युएस एफ्ल्यूएंट मॉनिटरिंग सिस्टीम विकसित; महाराष्ट्रातील पुणे ही पहिली महापालिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Corporation | मैलापाणी शुध्दीकरण केंद्रवर अत्याधुनिक यंत्रणा विकसित करून हे शुद्ध केलेले लेणी सध्या नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या शुद्धतेची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जाते. मात्र, आता ही तपासणी यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता पालिकेने ‘ऑनलाईन कंटीन्यूएस मॉनिटरिंग सिस्टीम’ (Continuous Monitoring System) बसविली आहे. त्यामुळे नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वेग अल्ट्रा व्हायलेट किरणांद्वारे मोजला जाणार आहे. तर, सेन्सर्सच्या माध्यमातून पाण्यातील पीएच, बीओडी, सीओडी, टेम्परेचर क्षणाक्षणाला मोजले जाणार आहे. ही माहिती पुणे महापालिका (Pune Corporation), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (maharashtra pollution control Board)आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Central) सर्व्हरवर दिसणार आहे.

मैलापाणी शुद्धीकरण केंद्र म्हटले की वास आणि त्यामुळे निर्माण होणारे दूषित वातावरण असा सर्वसाधारणपणे सर्वांचा अनुभव असतो.
मात्र, पुणे महानगरपालिकेच्या नायडू मैलाशुध्दीकरण प्रकल्पात याचा लवलेशही पाहायला मिळत नाही. शहरातील मैलापाण्यावर शुध्दीकरण करण्यासाठी सेंट्रल पोल्युशन बोर्डने काही नॉर्मस ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार याठिकाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबविली जाते.
पालिकेने दोन वर्षाकरीता ही यंत्रणा भाडेतत्वावर घेतली आहे.
त्यानंतर ती पालिकेच्या मालकीची होणार आहे.
अतिशय कमी दरात ही यंत्रणा भाडेतत्वावर विकसित करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.

 

या यंत्रणेद्वारे पाण्यातील पीएच, बीओडी, सीओडी, टेम्परेचर, फ्लो मोजण्यासोबतच तीनही यंत्रणांना त्यांच्या कार्यालयात ऑनलाईन पाहता येणार आहे.
या मोजनीमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्याकरिता ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता प्रमोद उंडे (executive eng. pramod unde), प्रमुख केमिस्ट (एसटीपी)
अस्लम शेख (chief chemist (STP) Aslam shaikh) यांनी ही माहिती दिली.

अनेकदा नागरिकांचा समज असतो की मैलापाणी शुध्दीकरण न करता नदीत सोडले जाते.
मात्र पालिकेच्या या शुध्दीकरण प्रकल्पात होणारी प्रक्रिया नागरिकांना कळावी यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे.

सध्या पुणे महानगरपालिकेकडून ९ एसटीपी सेंटरवर मिळून दिवसाला ५६० एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे पाणी नदीत सोडण्यात येत आहे.
काही प्लान्टवर क्षमतेपेक्षा अधिक मैलापाण्यावर शुद्धीकरण केले जाते.
शहरात दिवसाला १ हजार एमएलडी मैलापाण्याची निर्मिती होते.

नायडू एआटीपी सेंटर २०११ साली तयार करण्यात आले होते.
याठिकाणी नवे आणि जुने अशी दोन केंद्र आहेत.
यातील जुने केंद्र बंद करण्यास न्यायालयाने मान्यता दिलेली आहे.
मात्र, जोपर्यंत चालते आहे तोपर्यंत ९० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यास परवानगी दिलेली आहे.

शुध्दीकरण केलेले पाणी शेती, गार्डन, रस्ते काँक्रीट करण्यासाठी वापरले जाते.
त्याकरिता फिलिंग स्टेशन, टँकर पॉईंट तयार करण्यात आले आहेत.
रेल्वे धुण्यासाठी हे पाणी देण्याचा विचार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

नायडू एसटीपी सेंटरवर पालिकेने ‘ऑनलाईन कंटीन्यूएस मॉनिटरिंग सिस्टीम’ बसविली आहे.
अशा प्रकारची यंत्रणा बसविणारी पुणे महानगरपालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
या यंत्रणेद्वारे पाण्यातील पीएच, बीओडी, सीओडी, टेम्परेचर, फ्लो मोजण्यासोबतच सद्यःस्थितीची माहिती महापालिका, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला ऑनलाईन पाहता येणार आहे.

– श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग (Srinivasa Kandul, Chief Engineer, Electrical Department)

 

Web Title : Pune Corporation | Developed an online continuous effluent monitoring system for sewage treatment; Pune is the first municipal corporation in Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार ! शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री राणेंना ‘शह’

Modi Cabinet Decision | कॅबिनेटच्या निर्णयाने महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांना सर्वात जास्त फायदा, भारतीय कंपन्या बनतील जागतिक चॅम्पियन!

Pune Anti Corruption | पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक 5 लाखाच्या लाच प्रकरणी ‘गोत्यात’, एक लाख घेताना झाला ट्रॅप