Pune Corporation | पुण्यात लवकरच भाडेतत्वावर ई-बाईक्स उपलब्ध होणार !

निविदेशिवाय आलेल्या दोन कंपन्यांचा ई-बाईक सेवा देण्याचा प्रस्ताव ‘चर्चेशिवाय’ एकमताने मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation News | प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात ई-बाईक भाडेतत्वावर (e bike on rent) देणे तसेच या बाईक पुरविणार्‍या दोन कंपन्यांना या बाईक चार्जिंगसाठी शहरात ५०० ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंगळवारी पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आला. विशेष असे की राज्याने नुकतेच ई वाहतुकीचे धोरण जाहीर केले असताना या प्रस्तावावर कुठलिही चर्चा न करता तसेच निविदा अथवा एक्सप्रेशन ऑन इंटरेस्ट न मागविता सदस्यांनी सुचविलेल्या दोन कंपन्यांना हे काम देण्यात आले आल्याने ‘संशयाचे’ धुके दाटले आहेत.

विट्रो मोटर्स प्रा. लि. (Vitro Motors Pvt. Ltd.) आणि ईमॅट्रीक्स माईल (ematrixmile) या त्या दोन कंपन्या आहेत. शहरात विट्रो मोटर्स प्रा. लि. (Vitro Motors Pvt. Ltd.) या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावर ई बाईक पुरविणे तसेच या कंपनीला शहरात 500 विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जून 2020 मध्ये शहर सुधारणा समितीने मंजुर केला. समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनीच हा प्रस्ताव मांडला होता. यानंतर जुलै 2020 मध्येच स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. मागील डिसेंबरच्या कार्यपत्रिकेवर असलेल्या या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे (Pune Corporation) ई बाईक्स (e-bikes) पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ईमॅट्रीक्स माईल (ematrixmile) या कंपनीचाही समावेश केला. आज या प्रस्तावाला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

वाढते प्रदूषण आणि पेट्रोल व डिझेलसारख्या पारंपारिक इंधनातील दरवाढ (petrol diesel price increase) यामुळे सर्वसामान्यांना परवडेल आणि प्रदूषणही कमी होईल यासाठी ई बाईक भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या ई बाईक्सचा भाडेदर 149 कि.मी. पर्यंत प्रति कि.मी. 4 रुपये, 150 कि.मी. ला 3 रुपये प्रति कि.मी., एक हजार कि.मी.ला 1 रुपये 90 पैसे तर 4 हजार कि.मी.साठी 95 पैसे इतका ठेवण्यात आला आहे. यासाठी काल मर्यादा देखिल घालून देण्यात आली आहे. यासाठी संबधित कंपन्यांना महापालिकेने 500 ठिकाणी पार्किंग आणि चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. याठिकाणी चार्जिंग स्टेशनचा सर्व खर्च या कंपन्या करणार आहेत.

यासाठी प्रशासनाने सहा अटी घातल्या आहेत.
यामध्ये पार्किंग अथवा चार्जिंग स्टेशनच्या जागा मुख्य रस्त्याच्या कडेला अर्बन स्ट्रीट गाईडलाईन नुसार सायकल ट्रॅक सोडून व फुटपाथवरील वॉकींग झोन मधील किमान 2 मी. रुंदीस बाधा येणार नाही अशी जागा सोडून असेल.
या जागांबद्दल वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल.
भविष्यात जागा बदल करावा लागल्यास होणारा खर्च संबधित कंपन्यांना करावा लागेल.
योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक निकषानुसार दुरूस्ती करण्याचे अधिकार आयुक्तांना राहातील, याचा अटींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

विशेष असे की, मागील काही महिन्यांतील पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर (petrol diesel price increase) ई व्हेईकल्सचा वापर वाढला आहे.
अनेक कंपन्यांनी ई बाईक्स व ई बसेसचे उत्पादन सुरू केले आहे.
महापालिका देखिल केवळ पीएमपीच्या बसेसच नाही तर अधिकार्‍यांची तसेच कचरा उचलण्याची वाहने देखिल विजेवर चालणारी असावीत यासाठी प्रयत्नशील आहे.
राज्य शासनानेही अवघ्या चार दिवसांपुर्वी प्रदूषण कमी करण्यासाठी ई वाहनांचा वापर वाढविण्याचे धोरण आखले असून याची सुरूवात शासकिय कार्यालयांपासून करण्याचे जाहीर केले आहे.
या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने ई बाईकचा वापर वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.
मात्र, कुठलिही निविदा प्रक्रिया न राबविता अथवा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट न मागविता ज्या कंपन्यांनी पुढाकार घेतला त्यांना हे काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
ई बाईक्स पुरविणार्‍या कंपन्यांची वाहने पुरविण्याची क्षमता,
जागांचे भाडे मुदतीत न भरल्यास करावयाची कारवाई,
बाईक भाडेतत्वावर देताना ग्राहकांसाठीच्या अटी आणि जबाबदारी अशा अंमलबजावणीच्या पातळीवरील एकाही मुद्दयावर चर्चा न करता सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने निर्णय घेतल्याने संशयाचे धुके दाटले आहेत.

Web Title :- Pune Corporation | E-bikes will soon be available in Pune on rental basis!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या