Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation Employees | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या २३ गावांतील ग्रामपंचायतीनी बोगस भरती केलेल्या ४६ कर्मचार्‍यांना (Pune Corporation Employees) महापालिकेने कमी केले आहे. यामध्ये तब्बल २७ कर्मचारी हे एकट्या बावधन बुद्रुक ग्रामपंचायतीतील (Bavdhan Budruk Gram Panchayat) असून त्याखालोखाल नर्‍हे ग्रामपंचायतीतील (Narhe Gram Panchayat) १२ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. (PMC Commissioner Vikram Kumar Order 46 PMC Employees Dismissed)

 

वर्षभरापुर्वी हद्दीवरील २३ गावांचा पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation) समावेश करण्यात आला. यामध्ये म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्‍हे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली गावांचा समावेश आहे. शासनाने गावे महापालिकेमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ग्रामपंचायींमध्ये कर्मचार्यांची मोठ्याप्रमाणावर बोगस भरती करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मागीलवर्षी प्रत्यक्षात गावे समाविष्ट करण्याचा आदेश निघाल्यानंतर महापालिकेने ग्रामपंचायतींचे मालमत्ता व कर्मचारी वर्गीकरणासह सर्व दप्तर ताब्यात घेतले. (Pune Corporation Employees)

 

दरम्यान कर्मचार्‍यांची बोगस भरती (Bogus Recruitment) केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष्य प्रसाद (Pune: Zilla Parishad CEO Ayush Prasad) यांनी चौकशी समिती (Inquiry Committee) स्थापन केली. या चौकशी समितीमध्ये ग्रामपंचायतींमध्ये बोगस भरती केल्यावर शिक्कामोर्तब झाले. महापालिकेने ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतलेल्या दप्तरांमध्ये ४६ कर्मचार्‍यांची नावे आढळली नाहीत. तोपर्यंत महापालिकेनेही Pune Municipal Corporation (PMC) ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना महापालिकेमध्ये नेमणूक दिली नव्हती. एवढेच नाही तर पुर्वीपासून काम करणार्‍या कर्मचार्‍यांचेही वेतन दिले नाही. जिल्हा परिषदेने चौकशी अहवाल महापालिकेला दिला असून त्यानुसार महापालिकेने कर्मचार्यांना नियुक्ती देण्यास सुरूवात केली आहे. चौकशी अहवालानुसार तब्बल ४६ कर्मचार्‍यांची बोगस भरती झाल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी या ४६ कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये बावधन बुद्रुक ग्रामपंचातीतील २७, नर्‍हे ग्रामपंचायतीतील १२, जांभूळवाडी- कोळेवाडी ग्रामपंचायतीतील ३, सूस, औताडे- हांडेवाडी, किरकटवाडी आणि मांगडेवाडी ग्रामपंचायतीतील प्रत्येकी एका कर्मचार्याचा समावेश आहे. ४६ कर्मचार्‍यांमध्ये ८ महिला कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

 

राज्य शासनाने २३ गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केल्यानंतर
पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण पडण्याच्या कालावधीत ‘राजकिय’ वरदहस्तामुळे ग्रामपंचायतींवर दबाव
आणून बोगस भरती झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.
या सर्व कर्मचार्‍यांना आरोग्य, साथरोग नियंत्रक, सफाई कर्मचारी, दिवाबत्ती कर्मचारी, कर वसुली कर्मचारी, चालक आणि
पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून अगदी अडीच ते सहा हजार रुपये वेतनावर नेमले होते.
महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या कर्मचार्‍यांना अगदी सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पाच आकडी पगार होणार होता.

 

Web Title :- Pune Corporation Employees | PMC Commissioner Vikram Kumar order to Dismissed 46 bogus employees from 23 villages covered by Pune Municipal Corporation Most bogus recruitment from Bavdhan Budruk Gram Panchayat And Narhe Gram Panchayat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2256 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Ankita Lokhande Video | लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा व्हिडिओ झाला व्हायरल

 

Mula Mutha Riverfront Development | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडर्गान पुला दरम्यानच्या कामाची निविदा उघडली; जाणून घ्या