Pune Corporation | नाना पेठेतील ‘दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या जागेचा करार वाढवून द्यावा; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहर सुधारणा समितीकडे प्रस्ताव

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Corporation | नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलच्या जागेचा करार महापालिकेने (Pune Corporation) ३० वर्षे वाढवून द्यावा, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे दिल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष व नगरसेवक प्रशांत जगताप (NCP city president and corporator Prashant Jagtap) आणि विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (PMC Leader of Opposition Deepali Dhumal) यांनी दिला आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना जगताप आणि धुमाळ यांनी सांगितले
कि महापालिकेने ९० वर्षांपुर्वी नाना पेठेतील जागा डिस्प्रेड क्लास मिशनला नाममात्र भाडेकराराने दिली होती.
डिस्प्रेड क्लास मिशनच्या माध्यमातून याठिकाणी महाविद्यालय, मुली व मुलांचे हायस्कूल चालविण्यात येते.
या शाळा आणि महाविद्यालयामध्ये तळागाळातील तसेच बहुजन वर्गातील लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून अनेक पिढ्या साक्षर झाल्या आहेत.

परंतु, फेब्रुवारी महिन्यात करार संपला असून, महापालिकेकडून संस्थेला करार वाढवून
देण्याबाबत कोणतीही हालचाल केली जात नाही. त्यामुळे, संस्था, विद्यार्थी-पालकांपुढे चिंता आहे.
त्यामुळे, या संस्थेस देण्यात आलेल्या जागेचा करार हा पूर्वीच्याच दराने आणि
आणखी ३० वर्षांसाठी वाढवून देण्यात यावा, असे आवाहन मी महापौर मुरलीधर मोहोळ,
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि सभागृह नेते गणेश बीडकर (सभागृह नेते) यांना करीत आहे.
मुदतवाढ न दिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहरात आंदोलन उभारले जाईल.

 

या शिक्षण संस्थांना राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.
या संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय,
महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलमधून
बहुजन समाजातील बहुसंख्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
बहुजन समाजातील अनेक पिढ्या घडविण्याचे काम या संस्थेने केले आहे.
अशा परिस्थितीत महानगरपालिकेने गेल्या जवळपास ९० वर्षांपासून कार्यरत
असलेल्या या संस्थेचा इतिहास आणि संस्थेमार्फत सुरू असलेले कोणतेही कार्य लक्षात घेतलेले दिसत नाही.
महापालिकेच्या सत्ताधार्‍यांनी या जागेकडे केवळ महापालिकेची जागा म्हणून
न पाहता बहुजनांची पिढी घडविणारी संस्था म्हणून पाहावे, म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात येईल.

दुर्दैवाने महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप व या पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी त्याकडे
दुर्लक्ष करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच प्रयत्न करीत असल्याची शंका आहे.
इतर संस्थांच्या तुलनेत येथे आकारण्यात येणारी फी अगदी कमी असल्याने ती विद्यार्थ्यांना परवडत आहे. शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. त्यामुळे, हे महाविद्यालय व हायस्कूल आहे त्याच जागेत
यापुढेही सुरू राहणे ही येथील विद्यार्थ्यांची गरज असल्याचे मतही जगताप यांनी व्यक्त केली.
तसेच काही तांत्रिक कारणास्तव राज्य शासन पातळीवर अडचण येत असल्यास ती
दूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जगताप यांनी नमूद केले.

 

Web Title : Pune Corporation | Extension of contract for The Depressed Classes Mission in Nana Peth; NCP’s proposal to the City Improvement Committee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | 65 लाख पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा ! 45 दिवसात प्रकरणे निकाली काढणार, कार्यालयांच्या माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

Pune Crime | पुण्यातील आणखी एका टोळीवर मोक्काची कारवाई, येरवडा परिसरात दहशत पसरविण्याचा केला होता प्रयत्न

Pune Corporation | भुमिगत इंटरनेटर केबलवर महापालिका ‘मिळकत कर’ आकारणार; उत्पन्न वाढीसाठी ‘भिलाई’ पॅटर्न राबविणार