Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ संस्थेस 30 वर्षे भाडेकरार वाढीस मुदतवाढ; सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय (Live Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेसड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ (the depressed classes mission society of india) या संस्थेला देण्यात आलेल्या जागेचा करार 30 वर्षाने वाढविण्यास आज सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. तसेच हा करार 90 वर्षापर्यंत वाढवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यास सर्व पक्षीय सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. या संस्थेला देण्यात आलेल्या जागेचा 90 वर्षांपूर्वी केलेला करार यावर्षी फेब्रुवारी मध्ये संपुष्टात (Pune Corporation GB) आला आहे.

 

माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap), विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal), नगरसेवक युवराज बेलदरे (Corporator Yuvraj Beldare) यांनी या संस्थेचा करार 30 वर्षांनी वाढवण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे (pmc standing committee) ठेवला होता. या संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा फुले मुलांचे हायस्कूल चालविण्यात येते. 90 वर्षे जुनी ही संस्था असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला भेट दिली होती. या शाळेत शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे या संस्थेचा भाडेकरार 30 वर्षांनी वाढवावा, तसेच मुदतवाढीस शासनाकडे प्रकरण मान्यतेस प्रकरण पाठवावे असे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. तसेच पाठोपाठ उपमहापौर सुनीता वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, हिमाली कांबळे यांनी देखील याच स्वरूपाचा प्रस्ताव देत 90 वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. स्थायी समितीने या दोन्ही प्रस्तावांना मान्यता देत दोन्ही प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे (Pune Corporation GB) पाठवले होते.

 

प्रशांत जगताप म्हणाले, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे अभिनंदन करतो. दि डिप्रेसड कलासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने अनेक दिन दुबळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना घडविले आहे. मी याच संस्थेत शिक्षण घेतले आहे. अशा संस्थांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सदस्यांनी मांडण्याची वेळ येऊ नये. परंतु आज एकमताने निर्णय झाला याबद्दल सभागृहाचे अभिनंदन करतो.

अरविंद शिंदे (Arvind Shinde) म्हणाले ही संस्था खूप जुनी आहे.
वास्तूचे स्त्रकचरल ऑडिट करून योग्य तिची दुरुस्ती करावी.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, जागा वाटप नियमावली नुसार दर लावावे लागतील असे माजी आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले होते.
महापालिका 30 वर्षे भाडेतत्वावर देऊ शकते, तसा ठराव दिला आहे. परंतु 90 वर्षाचा करार करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात.

 

उपमहापौर सुनीता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar) यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
सभागृह नेते गणेश बिडकर (PMC Leader of the House Ganesh Bidkar) म्हणाले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या संस्थेला शंभर वर्षे होत आहेत.
संपुर्ण सभागृह (Pune Corporation GB) एका चांगल्या विषयासाठी एकत्र आले, ही पुण्याची खरी ओळख आहे.

 

Web Title :- Pune Corporation GB | 30-year lease extension extended to ‘The Depressed Classes Mission Society of India’ in Nana Peth ; Decision unanimously in pune corporation general body meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Officer Sameer Wankhede | वारंवारच्या आरोपांविरोधात NCB अधिकारी समीर वानखेडेंची कोर्टात धाव; एनसीबीचाही अर्ज

Pune Crime | उत्सुकतेपोटी पुण्यातील बुधवार पेठ पाहण्यासाठी गेला अन् पुढं घडलं ‘असं’ काही; जाणून घ्या प्रकरण

Shambhuraje Desai | गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी घेतली पोलिसांची ‘झाडाझडती’, अधिकार्‍याचे उपटले कान (व्हिडीओ)