Pune Corporation GB | तुकाई दर्शन येथील पाण्याच्या टाकीचे पाणी ‘महंमद वाडी’ला वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – माजी महापौर वैशाली बनकर (व्हिडीओ)

पुणे – Pune Corporation GB | हडपसर (Hadapsar) येथील तुकाई दर्शन (Tukai Darshan) येथील पाण्याच्या टाकीतून महमंदवाडीला (Mohamadwadi) पाणी दिल्याने तुकाई दर्शन परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कुठलाही अभ्यास न करता परस्पर पाणी वळविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ,माजी महापौर वैशाली बनकर ( Former mayor Vaishali Bankar) यांनी आज सर्वसाधारण सभेत (Pune Corporation GB) केली.

 

 

 

 

सर्वसाधारण सभेत (Pune Corporation General Body Meeting) वैशाली बनकर म्हणाल्या तुकाई दर्शन येथे 2012 ला पाण्याची टाकी उभारली होती. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. परंतु आता त्या ठिकाणी आणखी 18 इंची लाईन टाकून पाणी महंमद वाडीला नेण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याची दखल आपण घ्यावी. प्रशासनाने कुठल्या अधिकारात हे पाणी वळविले? प्रशासन (Pune Corporation GB) दिशाभूल करण्याचे काम करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई (Take Action On PMC Officers) करावी.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

 

महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी याची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (pmc additional commissioner ravindra binwade) आणि पाणी पुरवठा अधीक्षक अनिरुद्ध पावसकर (PMC Water Supply Superintendent Aniruddha Pawaskar) यांनी उद्याच तुकाई टेकडी येथे जाऊन पाहणी करावी, व योग्य कारवाई करावी असे आदेश दिले.
यातून मार्ग न निघाल्यास मी स्वतः बैठक घेईल असे आश्वासनही मोहोळ यांनी यावेळी दिले.

हे देखील वाचा

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचा फोटो ‘व्हायरल’

Pune Police | पुण्यातील ‘त्या’ 19 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांवर ‘घोर’ अन्याय?, जाणून घ्या प्रकरण

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Corporation GB | Action should be taken against the officials who diverted water from Tukai Darshan to ‘Mohammad Wadi’ – Former Mayor Vaishali Bankar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update