Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

पुणे – Pune Corporation GB | नदी काठ सुधार योजना राबविण्यासाठीच्या सुमारे 4 हजार 727 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पहिल्या तीन पॅकेज चे काम प्रायोगिक तत्वावर करण्याचा निर्णय आज सर्वसाधरण सभेमध्ये (Pune Corporation GB) घेण्यात आला. यापैकी एक पॅकेजचा 700 कोटी रुपये खर्च महापालिकेच्या आर्थिक तरतुदीतून करण्यात यावा, तर उर्वरित काम पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) वतीने शहरातील मुळा – मुठा नदीकाठ सुधार (mula mutha riverfront development) करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 4 हजार 727 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुढील पाच वर्षे अंदाजपत्रकात प्रकल्पासाठी तरतूद करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. नदीकाठ सुधार योजनेला 2018 ला मान्यता देण्यात आली असून त्यावेळी हा खर्च 2650 कोटी होता.

याला उपसूचना देऊन या योजनेच्या 11 पैकी तीन टप्पे हे प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार येतील. यापैकी एका टप्प्यासाठी येणारा 700 कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून करण्याचा व उर्वरित खर्च पीपीपी (PPP) तत्वावर करण्याचा निर्णय एकमताने (Pune Corporation GB) घेण्यात आला.

डॉ. सिद्धार्थ धेंडे (corporator dr siddharth dhende) यांनी 72 ब मुळें महापालिकेचे (Pune Corporation) दायित्व वाढणार आहे.
मोठया प्रकल्पाच्या नादात अत्यावश्यक कामांसाठी पालिकेकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत अशी भीती व्यक्त केली.
अविनाश बागवे यांनी नेमके कोणते तीन पॅकेज करणार याची स्पष्टता नाही.
पूर्वीपेक्षा दुप्पट खर्च होणार आहे मात्र पूर्वीपेक्षा काम कमी झाले आहे.
पुणे, पिंपरी, कॅन्टोन्मेंट यांचा शेअर काय असेल याची स्पष्टता नाही.
पालिकेला आर्थिक संकटात लोटण्याऐवजी एक टप्पा पीपीपी तत्वावर करावा व त्याचे परिणाम पाहून पुढील अंमलबजावणी करावी.

Pune News | पुण्याच्या हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; साडेसतरा नळी आणि भोसले वस्ती परिसरात दहशतीचे वातावरण

विशाल तांबे (corporator vishal tambe) म्हणाले आपण या निमित्ताने आणखी एक एसपीव्ही कंपनी (SVP Company) स्थापन करत आहोत.
पालिकेचे साडेचार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न असताना दायित्व हजारो कोटी रुपयांचे घेत आहोत. यामध्ये  काय गौडबंगाल आहे.
इन्व्हायरमेन्ट अहवालात आपण बांधकाम होणार नाही असे म्हणतोय तर दुसरीकडे 18 हजार चौ. मी. चे बांधकाम करणार आहोत.
दत्तात्रय धनकवडे (corporator dattatray dhankawade) म्हणाले,  आमच्या काळात सुरू झालेल्या याप्रकल्पला सुरुवात झाली.
विलंब झाल्याने खर्च वाढला आहे.

प्रशांत जगताप (corporator prashant jagtap) म्हणाले, या प्रकल्पाचे सादरीकरण त्यांचे नेते शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडेही करण्यात आले आहे.
हा प्रकल्प करताना अगदी खडकवासला पासून चा विचार करावा.
हा प्रकल्प पूर्ण करताना तो पुणेकरांच्या पसंतीस उतरला पाहिजे याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Aryan Khan Drugs Case | वानखेडेंवर आरोप करणारे प्रभाकर साईल यांच्या आई हिरावती यांचा मोठा गौप्यस्फोट; जाणून घ्या आता कोण अडचणीत येणार?

पृथ्वीराज सुतार (corporator prithviraj sutar) म्हणाले, हा प्रकल्प करताना विश्वासाला तडा जाणार नाही. आदर्श प्रकल्प करा असे आवाहन केले. आबा बागुल म्हणाले, नदी सुंदर होणार आहे. सभागृहात डीपीआर (DPR) मांडला असता तर सर्वांना माहिती मिळाली असती आणखी काही नवीन कल्पना पुढे आल्या असत्या. साबरमती प्रकल्पाप्रमाणे आपल्याला सरकारकडून निधी मिळाला तर बरे झाले असते. सीएसआर मधून ही यासाठी निधी मिळू शकेल याचाही विचार करावा.  विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी प्रकल्पाला पाठिंबा देताना मुळा मुठा साबरमती होऊ नये. प्रकल्प पर्यावरण पूरक व्हावा अशी अपेक्षा आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करावा.

गणेश बिडकर (Ganesh Bidkar) म्हणाले, या प्रकल्पावर एकमत झाले आहे ही सभागृहाची खासियत आहे. राज्य शासनाने  मान्यता दिली आहे. सर्वांनी विचार करून हा प्रकल्प आणला आहे. हा प्रकल्प 11 पॅकेज मध्ये करणार आहोत. त्यामुळे लगेच पैसे लागणार नाहीत. जगभरात नदीकाठ सुधार योजना राबवण्यात आल्या आहेत. आपल्याला 44 की.मी.चा नदीकाठ लाभला आहे हे आपले भाग्य आहे. आपल्या शहराची ताकद आहे मोठे प्रकल्प करण्याची . उत्पन्न वाढवण्यासाठी अभ्यासू नगरसेवकांचा एक गट तयार केला तर आपण सर्व प्रकल्प पुढे नेऊ शकतो. सगळे सदस्य शहराच्या चांगल्यासाठी एकत्र येतात, हा इतिहास आहे. आठ दिवसांत सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात. (Pune Corporation GB)

Air India चा सौदा झाला पक्का ! DIPAM ने सांगितले – ‘18000 कोटी रुपयांच्या करारावर झाले हस्ताक्षर’

नदीकाठ सुधार योजने साठी पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याचा प्रस्ताव दोन आठवड्यांपूर्वी स्थायी समितीमध्ये (pmc standing committee) मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर शहरातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पामुळे नदी जैव विविधेवर पर्यवरणाची हानी होणार असा आक्षेप घेत वाढलेल्या खर्चालाही विरोध केला होता.

सुभाष जगताप यांच्या वक्तव्यावरून ‘गोंधळ’

राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक सुभाष जगताप ( corporator subash jagtap) यांनी भाषणाला सुरुवात करतानाच 72 ब वरून वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल ‘ अपशब्द ‘ वापरल्याने सातधारी संतप्त झाले. जगताप यांनी माफी मागावी अशी मागणी करत कामकाज रोखून धरले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही जगताप यांची समजूत घातल्यानंतर जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु सत्ताधारी नगरसेवकांचे त्यावर समाधान झाले नाही. सभापती उपमहापौर सुनीता वाडेकर (deputy mayor sunita wadekar) यांनी जगताप यांना भाषणास परवानगी नाकारल्याने जगताप यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभात्याग केला.  यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप (pune ncp city president prashant jagtap) यांनी सुभाष जगताप यांच्याकडून अनावधानाने शब्द गेल्याबद्दल आयुक्तांची माफी मागितली.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Corporation GB | mula mutha riverfront development scheme will be implemented in 3 phases on PPP basis; 700 crore for one phase from pmc funds and the remaining 2 phases for PPP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update