Pune Corporation | …म्हणून केबल नियमीतीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी – हेमंत रासने

विद्रुपीकरण रोखण्यासोबतच शहराच्या विकासासाठी नवीन उत्पन्नाचा पर्याय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराचा विस्तार होत असताना विकासासाठी निधीही मोठ्याप्रमाणावर लागणार आहे. यासाठी महापालिकेचे (Pune Corporation) उत्पन्न वाढविण्याची (Income of PMC) गरज आहे. याचाच एक भाग म्हणून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या ओव्हरहेड केबल्स (overhead cables)अंडरग्राउंड करतानाच त्यातून महापालिकेलाही (Pune Corporation) उत्पन्न मिळेल, यासाठी केबलसाठी स्वतंत्र धोरण तयार केले. असे धोरण तयार करणारी पुणे ही देशातील एकमेव महापालिका ठरली, असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne) यांनी सांगितले.

शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या इंटरनेट, ब्रॉडबँड केबल्स टप्प्याटप्प्याने अंडरग्राउंड करण्यासाठी महापालिकेने धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेने या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या धोरणानुसार शहरातील बेकायदा ओव्हरहेड व अंडरग्राउंड केबल्स शोधून दंड आकारून त्या नियमीत करण्यात येणार आहे. बेकायदा केबल्स शोधण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले असून या कंपनीने मागील दोन महिन्यांत शहरातील तब्बल ७ हजार ४४० कि.मी.च्या विविध ब्रँडेड कंपन्यांच्या बेकायदा ओव्हरहेड केबल शोधून काढल्या आहेत. तशी संबधित कंपन्यांना नोटीसही दिली आहे. दंड आकारून या केबल्स नियमीत केल्यास महापालिकेला १० हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.

यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले २३ गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे महापालिका (Pune Corporation) भौगोलिकदृष्टया देशातील सर्वात मोठी महापालिका झाली आहे. या गावांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून काहीच निधी उपलब्ध झालेला नाही. शहरातही मोठे प्रकल्प सुरू आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर निधीची गरज आहे. शासनाकडून फारशी अपेक्षा नसल्याने मी प्रशासनाच्या मदतीने उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. मिळकतकर, बांधकाम परवाना शुल्क, GST हे उत्पन्नाचे पारंपारिक स्त्रोत आहेत. त्यालाही मर्याद आहेत. त्यामुळे नवीन पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

याचाच एक भाग म्हणून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या ओव्हरहेड केबल्स नियमीतीकरणाचे धोरण राबविण्यात येत आहे. पुण्यातील इंटरनेटचा वापर वाढत असताना यातून महापालिकेला उत्पन्न मिळावे, तसेच हे धोरण राबविताना इंटरनेट सेवेतही खंड पडणार नाही असा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळणार असून समाविष्ट गावांसह शहराच्या विकासासाठी याचा उपयोग होईल, असा दावाही रासने यांनी यावेळी केला.

Web Title : Pune Corporation | … hence the implementation of cable regularization policy – Hemant Rasane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाशसाठी करण कुंद्राने गुडघ्यावर बसून व्यक्त केलं ‘प्रेम’

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर