Pune Corporation | अखेर ‘स्वच्छ’ संस्थाच पुणे महापालिकेच्या मदतीला धावून आली; पालिकेच्या विनंतीवरून नव्याने समाविष्ट गावातील कचर्‍याचे विलगीकरण केले सुरू

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Corporation | शहरातील निम्म्याहून अधिक घरातून घरोघरी जावून ओला व सुका कचरा गोळा करणारी कष्टकरी महिलांची ‘स्वच्छ’ सहकारी संस्था पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) मदतीला धावुन आली. महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांपैकी सर्वाधीक घनतेच्या मांजरी गावात दररोज निर्माण होणार्‍या सुमारे ४० टन कचर्‍यापैकी निम्म्याहून अधिक कचर्‍याचे विलगीकरणाचे काम या संस्थेच्या कर्मचार्‍यांनी पालिकेच्या विनंतीवरून सुरू केले आहे. विशेष असे की महापालिकेतील सत्ताधारी शहरात मागील अनेक वर्षापासून कचरा गोळा करण्याचे काम करणार्‍या स्वच्छ संस्थेचे काम काढून घेउन ‘खाजगी कंपनीला’ देण्याच्या प्रयत्नांत असतानाही ‘स्वच्छ’ संस्थेने बांधिलकी जपत जोरदार चपराक लगावली आहे.

पुणे शहरात (Pune City) १० लाखांहून अधिक मिळकती आहेत. या मिळकतीतून दररोज घरोघरी जावुन ओला व सुका गोळा करण्याचे काम प्रामुख्याने स्वच्छ या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतू या संस्थेचे काम काढून मोठ्या कंपनीला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच मागील काही महिन्यांपुर्वी या संस्थेसोबत करण्यात आलेला कराराचे नूतनीकरण करण्याऐवजी त्यांना एक-दोन महिने मुदतवाढ देउन ‘अधांतरी’ ठेवण्यात आले आहे. या संस्थेत सुमारे ५ हजार कष्टकरी महिला व त्यांचे काम करत आहेत. आपल्या हातचे काम जाणार या विवंचनेतच ऐन कोरोना काळात धोका पत्करूनही काम करणार्‍या या संस्थेतील कष्टकरी महिलाच महापालिकेच्या अडचणीच्यावेळी धावून आल्या आहेत.

 

राज्य शासनाच्या आदेशानुसार ३० जून रोजी २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या गावांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज यासारख्या सुविधा तसेच कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.
परंतू सद्यस्थितीत या गावांमध्ये कचरा उचलण्याची अथवा त्यावर प्रक्रिया करण्याची कुठलिच व्यवस्था नसल्याने मोकळ्या जागा तसेच रस्त्याच्याकडेल कचर्‍याचे ढीग साठून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गावातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर न्यायचा असला तरी त्याचे विलगीकरण करण्याची अडचण प्रशासनापुढे ठाकली आहे.
प्रशासनाकडून स्वच्छ या संस्थेला विनंती केल्यानंतर त्यांनी समाविष्ट गावांत ज्याठिकाणी मिक्स कचरा टाकला जातो. तेथे ओला व सुका कचरा विलगीकरणाचे काम सुरू केले आहे.
मांजरी सारख्या गजबजलेल्या ठीकाणी दररोज सुमारे ४० टन कचरा गोळा होता.
मागील दोन तीन दिवसांपासून स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्‍यांनी यापैकी निम्म्याहून अधिक कचर्‍याचे विलगीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये विलगीकरण केलेला कचरा गोळा करण्याची कुठलिही सुविधा नाही.
त्यामुळे सर्व कचरा एकत्रित येत असल्याने प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत आहे.
मांजरी व अन्य काही गावांत स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने हा कचरा विलगीकरणास (Garbage segregation) सुरूवात करण्यात आली आहे.

– अजित देशमुख, उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

 

Web Title : Pune Corporation | In the end, only ‘Swachh’ came to the aid of Pune Municipal Corporation; Separation of newly included village waste started at the request of the municipality

Satara BJP | लाच घेणे पडले महागात, भाजपच्या वाई नगराध्यक्षांवर राज्य सरकारची मोठी कारवाई

BSNL | बीएसएनएलचा धमाका प्लॅन ! 120 दिवसांसाठी 240 GB Data सहित आणखी काही मिळणार सुविधा

Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी